नामंजूर (अल्बम - आयुष्यावर बोलू काही)

गीत :- नामंजूर
गीतकार  - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी ,संदीप खरे
स्वर - सलील कुलकर्णी , संदीप खरे
अल्बम - नामंजूर
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन्‌ वार्‍याची वाट पाहणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

मला ऋतूंची साथ नको अन्‌ कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा!
वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर!

माझ्या हाती विनाश माझा! कारण मी!
मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रुचे थिटे बहाणे - नामंजूर!

रुसवे-फुगवे ..... भांडणतंटे ..... लाख कळा
आपला-तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन्‌ घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे - नामंजूर!

नीती, तत्वे ..... फसवी गणिते! दूर बरी!
रक्‍तातिल आदिम जिण्याची ओढ खरी!
जगण्यासाठी रक्‍त वहाणे मज समजे,
पण रक्‍ताचा गर्व वहाणे - नामंजूर!
SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment