रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना | Ruperi Valut Madanchya banat ye na lyrics / -शांताराम नांदगावकर

रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना

बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल, लावीत प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना

बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहावरी फुले असा शहारा
तुझा इशारा... असा शहारा

लाजेत आज ही फुले नहाती
गाली अनार प्रीतगीत गाती
तू ये निशा अशी करी पुकारा
दे ये प्रिया मला तुझा निवारा
तुझा निवारा... तुझा निवारा

--------शांताराम नांदगावकर
SHARE

About shubh

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment