चिंब पावसानं रानं झालं / Chimb pavsan raan jhal lyrics

Chimb pavsan raan jhal lyrics / चिंब पावसानं रानं झालं

                                                                             -------ना. धो. महानोर
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी

झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी


SHARE

About shubh

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment