दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

Song : दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

Lyricist : Mandar Cholkar,
Music Director : Amitraj,
Singer : Adarsh Shinde - Kirti Killedar - Anandi Joshi,
Movie : Duniyadari (2013)



देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही
सांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काही
देवा कुठं शोधू तुला मला सांग ना
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
  माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी
  आरपार काळजात का दिलास घाव तू
  दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

  का कधी कुठे स्वप्न विरले,
प्रेम हरले स्वप्न माझे आज नव्याने खुलले
अर्थ सारे स्पर्शाने उलगडले
आरपार काळजात का दिलास घाव तू
  दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी
का रे तडफड ही ह्या काळजा मधी
घुसमट तुझी रे होते का कधी
  माणसाचा तू जल्म घे, डाव जो मांडला मोडू दे

का हात सुटले, श्वास मिटले,
ठेच लागे उत्तरांना प्रश्न कसे हे पडले
अंतरांचे अंतर कसे ना कळले

  देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
 
SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment