Song :- Dhagala lagli kala
Movie :- hath laval tithe gudgulya
Lyrics :- dada kondake
Music :-
Singers :- dada kondke
Dhagala lagli kala
paani themb themb gala
dhagala laagi kala
paani them themb gala
jasa juvacha jeev ghuutmala
tasa pirticha vadhtaye bala
tujhya tondala tond majha mela
aga hai baghun dusman jala
dhagala lagli kala
paani themb themb gala
chal ga rani gaaoya gani
phiruya pakhran sanga
ghamachya bharat
gar gar varyaat
angala bhidude ang
zala tujha ni majha jula, aiga
paani themb themb gala
dhagala lagli kala
paani themb themb gala
Movie :- hath laval tithe gudgulya
Lyrics :- dada kondake
Music :-
Singers :- dada kondke
Dhagala lagli kala
paani themb themb gala
dhagala laagi kala
paani them themb gala
jasa juvacha jeev ghuutmala
tasa pirticha vadhtaye bala
tujhya tondala tond majha mela
aga hai baghun dusman jala
dhagala lagli kala
paani themb themb gala
chal ga rani gaaoya gani
phiruya pakhran sanga
ghamachya bharat
gar gar varyaat
angala bhidude ang
zala tujha ni majha jula, aiga
paani themb themb gala
dhagala lagli kala
paani themb themb gala
संपूर्ण आठ कडव्यांचं गाणं मराठीत गुगलवर सापडेना म्हणून मीच लिहून काढलं...
ReplyDeleteदादांसारखा कोणी कलाकार मराठी चित्रपट सृष्टीत दुसरा होणं शक्य नाही.
चित्रपट : बोट लावीन तीथे गुदगुल्या
कलाकार : दादा कोंडके, उषा चव्हाण
गीतकार : दादा कोंडके
गायक : जयवंत कुलकर्णी (दादांसाठी), उषा मंगेशकर
दादा : जसा जीवात जीव घुटमळं...
दादा : तसं प्रीतीचं (पीरतीचं) वाढतंय बळं....
दादा : तुझ्या तोंडाला तोंडं माझं मिळं....
दादा : अग अन हे बघून दुश्मन जळं....
दादा : वरं ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....
दादा : ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....
दादा : वरं ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....।धृ।
दादा : चल गं राणी...गाऊया गाणी...फिरुया पाखरासंग
उषा : रामाच्या पाऱ्यात...गारगार वाऱ्यात...अंगाला भिडूदे अंग...
दादा : जेंव्हा तुझं नी माझं जुळं... पाणी थेंब थेंब गळं....।१।
कोरस : ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....
दादा : सुंदर मुखडा...सोन्याचा तुकडा...कुठं हा घेऊन जावा...
उषा : काय बाई आक्रीत...झालया ईपरीत...कशाला वाट कुणी दावा...
उषा : माझ्या पदरांत पडलंय खुळं....पाणी थेंब थेंब गळं....।२।
कोरस : ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....
दादा : जमीन आपली...उन्हानं तापली...लाललाल झालीया माती...
उषा : करूया कामं...अन गाळुया घाम...चला पिकवू माणिक मोती...
दादा : एका वर्षात होईल तीळं....पाणी थेंब थेंब गळं....।३।
कोरस : ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....
दादा : शिवार फुलतंय...तोऱ्यात डुलतयं...झोक्यांत नाचतोय धोतरा...
उषा : तुरीच्या शेंगा...डोलत्यात झेंगा...लपलाय भुईमुंग भित्रा...
दादा : मधी वाटाणा बघ वळवळं....पाणी थेंब थेंब गळं...।४।
कोरस : ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....
दादा : झाडावरं बुलबुल...बोलत्यात गुलगुल...वराती या कोकिळा...
उषा : चिमणी झुरते उगीच...राघू मैनेवरती खुळा...
दादा : मोरं लांडोरींसंग खेळं....पाणी थेंब थेंब गळं....।५।
कोरस : ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....
दादा : थुईथुई नाचते...खूषीत हसते...मनांत फुलपाखरू...
उषा : सोडा की राया...नाजूक काया...नका गुदगुल्या करू...
दादा : तू दमयंती मी नळं....पाणी थेंब थेंब गळं....।६।
कोरस : ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....
दादा : बामणाच्या मळ्यांत...कमळाच्या तळ्यांत...येशील का संध्याकाळी...
उषा : जाऊ दुसरीकडं...नको बाबा तिकडं...बसलाय संतू माळी...
उषा : म्हाताऱ्याला त्या लागलाय चळं....पाणी थेंब थेंब गळं....।७।
कोरस : ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....
दादा : आलोया फर्मात...पडलोया प्रेमात (पेरमात)...सांग मी दिसतोय कसा...
उषा : सांगू...अडाणी ठोकळा...मनाचा मोकळा...पांडू हवालदार जसा...
उषा : तुझ्या वाचून जीव तळमळं....पाणी थेंब थेंब गळं....।८।
कोरस : ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....
बाकी रसिकांच्या सोयीसाठी युट्युबवर गाण्याखाली कॉमेंट्स मध्ये मी या गाण्याची शब्दरचना पोस्ट केली आहे.
ReplyDeleteआणीबाणीच्या काळात सक्तीने नसबंदी आणि कुटुंब नियोजनाचं सत्र चालू होतं त्यावर टिका म्हणून दादांनी या गाण्यात घातलेल्या शर्टावर कुटुंब नियोजनाचं चिन्ह आहे. तसंच सातव्या कडव्यात भाजपवर टिका केलेली आहे. फक्त दादांसारखाच माणूस हे त्या काळात करू शकत होता.
मराठी तरुण-तरुणींनी हे गाणं बसवून गाऊन त्याचा प्रसार आणि प्रचार करा. त्यातील द्वैअर्थी चावट ओळीही ईतरांना समजावून सांगा. मराठी सारखी अन्वयार्थी शब्दांनी समृद्ध असणारी दुसरी कोणतीही भाषा नाहीये हे अमराठी लोकांना समजावून सांगा.