तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम | देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम ||

गीत - तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम
 गीतकार - संत गोराकुंभार
संगीत - सुधीरफडके
गायक - सुधीर फडके



 ==================================================================

Marathi
 
 तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम 
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम 
तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम
तुझे रूप चित्ती राहो..... 

देह धारी जो जो त्यासी विहित नित्यकर्म,
सदाचार नीतीहुनी आगळा न धर्म
तुला आठवावे गावे, हाच एक नेम 
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम 
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम

तुझे नाम पांडुरंग सर्वताप नाशी, 
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी  
दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम
देह प्रपंचाचा दास,  सुखे करो काम
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
तुझे रूप चित्ती राहो

तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा, म्हणुनी आठ याम 

देह प्रपंचाचा दास,  सुखे करो काम
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम 


पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग ...
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग ...
पांडुरंग जी पंदुरंजा पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग 
SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment