Ek tutari dya maj anuni / एक तुतारी द्या मज आणुनी -- #केशवसुत

Ek tutari dya maj anuni / एक #तुतारी द्या मज आणुनी

एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सारी गगने
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने,
अशी तुतारी द्या मजलागुनि
जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या दंभावर,ह्या बंडावर
शुरांनो या त्वरा करा रे
समते चा ध्वज उंच धारा रे
नीती ची द्वाही फिरवा रे
तुतारीच्या या सुरा बरोबर

-- केशवसुत 
SHARE

About shubh

    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments: