Jinku kinva maru / जिंकू किंवा मरू - ग. दि. माडगूळकर

माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू

जिंकू किंवा मरू

लढती सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्‍त्राघाता शस्‍त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर
पिढ्यापिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू

------ ग. दि. माडगूळकर
SHARE

About shubh

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment