अरे मनमोहना, कळली देवा तुला, राधिका रे राधिका

अरे मनमोहना,
कळली देवा तुला, राधिका रे राधिका
कळली राधिका रे कळल्या गोपिका
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही

सात सुरांवर तन-मन नाचे
तालावरती मधुबन नाचे
एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही

धुंद सुगंधी यमुना लहरी
उजळून आली गोकुळ नगरी
जीवन माझे अंधाराचे
काळी काळी रात कधी टळली नाही

उन्हात काया, मनात छाया
कशी समजावू वेडी माया
युग युग सरले, डोळे भरले
आशेची कळी कधी फुलली नाही
SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment