तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं

 Song :- तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं
 Movie :- shapit ( 1982)
 Lyrics :- sudhir moghe
 Music :-
Singers :- Asha Bhosle - Suresh Wadkarतुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं  
तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं नव्या घरामंदी काय नविन घडंल घरकुलासंग समदं येगळं होईल दिस जातील, दिस येतील भोग सरंल, सुख येईल अवकळा समदी जाईल निघूनी तरारलं बीज तुज माझ्या कुशीतूनी मिळंल का त्याला, उन वारा पानी राहिल का सुकंल ते तुझ्या माझ्या वानी रोप आपुलच पर होईल येगळं दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं ढगावानी बरसंल त्यो, वार्‍यावानी हसवंल त्यो फुलावानी सुखविल, काट्यालाबी खेळविल समद्या दुनियेचं मन रिझविल त्यो आसंल त्यो कुनावानी, कसा गं दिसंल तुझ्या माझ्या जीवाचा त्यो आरसा असंल उडूनिया जाईल ही आसवांची रात अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट पहांटच्या दंवावानी तान्हं तुजं-माजं सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं इवल्याशा पणतीचा इवलासा जीव त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव
SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment