मामाच्या गावाला जाऊया | Mamachya gavala javu Yaa Lyrics

 Song :-मामाच्या गावाला जाऊया


झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा,
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहून येऊया,
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको घोरटी,
म्हणेल कुठली पोरटी

भाच्यांची नावे सांगूया,
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको सुगरणं,
रोज रोज पोळी शिकरणं
गुलाबजामुन खाऊया,
मामाच्या गावाला जाऊया

मामा मोठा तालेवार,
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी घेऊया,
मामाच्या गावाला जाऊया
SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment