धुंदीत गाऊ मस्तीत राहू |dhundit gau mastit rahu lyrics

धुंदीत गाऊ मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा
थंडी गुलाबी हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत साजणी

रुपेरी उन्हांत धुके दाटलेले
दुधी चांदणे हे जणु गोठलेले
असा हात हाती तू एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा

दंवाने भिजावी इथे झाडवेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी
अशी मीलनाची आहे रीत साजणी

अशी हिरवळीची शाल पांघरावी
लाली फळांची गाली चढावी
हळूहळू वारा झंकारि तारा
आळवित प्रीतिचे संगीत साजणा

जळी यौवनाच्या डुले हा शिकारा
असा हा निवारा असा हा उबारा
अशा रम्य काली नशा आज आली
एकांत झाला जणू आज पाहुणा
SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment