या जन्मावर, या जगण्यावर,
शतदा प्रेम करावे चंचल वारा या जलधारा,
भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण
तशी ही रुजून आली पाती फुले लाजरी बघून कुणाचे,
हळवे ओठ स्मरावे रंगांचा उघडूनिया पंखा,
सांज कुणीही केली काळोखाच्या दारावरती,
नक्षत्रांच्या वेली सहा ऋतूंचे सहा सोहळे,
येथे भान हरावे बाळाच्या चिमण्या ओठांतून,
हाक बोबडी येते वेलीवरती प्रेम प्रियेचे,
जन्म फुलांनी घेते नदीच्या काठी सजणासाठी,
गाणे गात झुरावे या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावी,
इथल्या जगण्या साठी इथल्या पिंपळ पानावरती,
अवघे विश्र्व तरावे
0 comments:
Post a Comment