Konache he ghar ha deh konacha / कोणाचें हें घर हा देह कोणाचा

konache he ghar ha deh konacha / कोणाचें हें घर हा देह कोणाचा 

कोणाचें हें घर हा देह कोणाचा । 
आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥ १॥ 
मी तूं हा विचार विवेक शोधावा । 
गोविंदा माधवा याच देहीं ॥ २॥ 
देहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवेगळा । 
सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा ॥ ३॥ 
ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । 
या नावें रूपें तुम्ही जाणा ॥ ४॥
SHARE

About shubh

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment