माझ्या गोव्याच्या भूमीत / Mazya goachya bhumit ---- बा. भ. बोरकर

Mazya goachya bhumit / माझ्या गोव्याच्या भूमीत

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे
कड्याकपारीमधोनी घट फुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा

माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात

माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती, निळे पाणी
खोल आरक्‍त घावांत शुद्ध वेदनांची गाणी

                                            ---- बा. भ. बोरकर
SHARE

About shubh

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment